13 April 2021 3:52 AM
अँप डाउनलोड

मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांकडून याची चौकशी करावी - रुपाली चाकणकर

NCP Rupali Chakankar, Mocked MNS, Shadow cabinet

पुणे, २३ फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या संदीप देशपांडे याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं. मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी, असं खोचक ट्विट चाकणकर यांनी केलंय.

तत्पूर्वी देखील त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले होते. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे कधीच सार्वजनिक जबाबदारी समजू शकत नाही. सार्वजनिक जीवनामध्ये मालमत्तेची तोडफोड करणे हा एक भाग झाला. आणि लोकांच्या जीवनाची सुरक्षितता करणे, त्यासंदर्भात उपाययोजना करणे, खबरदारी करणे यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांच्या हिताचं संरक्षण करावं लागतं, हे मनसेचे पदाधिकारी कधी समजू शकत नाहीत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर टीका केली की, हे अधिवेशन घ्यायचे नाही म्हणून लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत.

कुठेतरी खोटी आकडेवारी दाखवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यायचे नसल्याने लॉकडाऊनची भीती दाखवली जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याचे वक्तव्य योग्य नाही. महाविकासआघाडी सरकार जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, अशी विनंती महेश तपासे यांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना केली होती.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena has criticised Chief Minister Uddhav Thackeray and the Mahavikas Aghadi government. MNS general secretary Sandeep Deshpande warned the people not to fear lockdown as they have doubts about the rising number of corona in the state. NCP state president Rupali Chakankar mocked MNS.

News English Title: NCP state president Rupali Chakankar mocked MNS over shadow cabinet news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(153)#RupaliChakankar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x