27 April 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सर्वपक्षीय बैठक | निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या - फडणवीस

Devendra Fadnavis, lockdown

मुंबई, १० एप्रिल: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून अध्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

बैठकीतले महत्वाचे मुद्दे :

  • लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : उद्धव ठाकरे
    रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आलीये
    रेमडेस्विर आणि ऑक्सिजनचा तुटवडा
  • ऑक्सिजन, बेड लवकर उपलब्ध करा : फडणवीस
  • रेमडेस्विर तात्काळ द्या : फडणवीस
  • मागचं वर्ष वाया गेलं : फडणवीस
  • राज्य सरकाराल पुर्ण सहकार्य करु : फडणवीस
    निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या
  • कडक लॉकडाऊनची गरज नाहीतर १५ तारखेनंतर भीषण परिस्थीती
    सरसकट लीकरणाची गरज
  • सगळ्यांनी एकत्र यायची गरज, राजकारण करु नका : मुख्यमंत्री
  • राज्याचं कर्ज वाढलं तर वाढू द्या : फडणवीस

 

News English Summary: Strict restrictions were imposed at the district level to curb the growing prevalence of corona in the state. Weekend lockdown has also been decided. However, despite various measures, it is not possible to prevent the spread of corona. In such a case, an all-party meeting is held. Several ministers in the state government, including the chief minister, are considering a complete lockdown in the state.

News English Title: Devendra Fadnavis raised the issue during all party meet over lockdown news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x