31 May 2020 9:25 AM
अँप डाउनलोड

डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतो..पोलिसांचे काम देखील डॉक्टरांइतकेच

Corona Crisis, CM Uddhav Thackeray

मुंबई, २९ मार्च: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा १८६ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या भीतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असतानाही वाढता जाणारा रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडले. तसंच ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या या परिस्थितीत मोठी दुर्घटना घडेल असं काही करु नका. स्थलांतर करु नका, आपण जिथं आहात तिथं थांबा, तुमची व्यवस्था करण्यात येईल. सरकारला विनाकारण कठोर पावलं उचलायला लावू नका. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवरचा ताण वाढवू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, एक चांगली टीम तयार झाली आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातलं आहे. कोणताही देश कोणत्याही देशाच्या मदतीला धावून येत नाही असं चित्र आहे. ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे ते भीषण आहे. ती दृश्यं पाहिल्यानंतर ते चित्र भयंकर आहे. इतर राज्यातल्या कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये. त्यांची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार. राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आम्ही करतो आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

 

News English Summary: Corona’s multiplication time has now begun, stopping is possible only if the corona is stopped at the first step. Chief Minister Uddhav Thackeray today appealed to the state of emergency to not leave the house without reason. At this time, he thanked the doctors, health workers and police working in the war with Corona. Chief Minister Thackeray said, “Do not do anything that will cause a major tragedy in this situation of Corona.” Do not migrate, stop where you are, you will be arranged. Don’t force the government to take drastic measures without cause. Chief Minister Uddhav Thackeray said that everyone should recognize their responsibility and work. Do not stress the people who provide essential services.

 

News English Title: Story oppositions and Maharashtra government came together against corona says Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(244)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x