17 February 2020 6:12 AM
अँप डाउनलोड

समाज माध्यमांवरील ९० टक्के प्रतिक्रिया भाजपविरोधात; तरी अंतर्गत सर्व्हेत २२९ जागा ही रणनीती? सविस्तर

Social Media, BJP Maharashtra, Maharashtra Assembly Election 2019, Facebook

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.

Loading...

विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे. मात्र या आकड्यांच्या साहाय्याने विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून होईल, असं चित्र आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्षाकडून एक सर्वेक्षण (सर्व्हे) करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याभरातच युतीच्या जगावाटपावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं सत्र सुरु होणार आहे.

२०१४ साली स्वतंत्र लढलेले शिवसेना – भाजप हे पक्ष यंदाची विधानसभा निवडणूक युतीत लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून १८३ जागांचं बहुमत आहे. सर्व्हेच्या आकड्यांनुसार त्यात आणखी ४० ते ५० जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी फक्त ५० ते ६० जागांपर्यंत सीमित राहण्याची चिन्हं दिसत आहेत.

विशेष म्हणजे सर्व्हे करणारा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपने महायुती होणार, ही बाब लक्षात घेऊन सर्व्हे केलेला आहे. याचाच अर्थ युतीत निवडणूक लढवण्याची भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेदेखील मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा दावा सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून युतीतच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मात्र २०१४ पासून भाजपच्या असाच अंर्तगत सर्व्हेचा अभ्यास केल्यास ते केवळ विरोधकांना मानसिक दृष्ट्या कमजोर करण्यासाठीच असतात, ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो. राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकात असेच अंतर्गत सव्हे करून ते ‘सरकारच्या दरबारी प्रसार माध्यमांमार्फत’ उचलून धरण्यास सांगितले गेले. मात्र वास्तविक मतमोजणीनंतर वेगळेच आकडे समोर आले. वास्तविक जे आकडे आले ते देखील याच अंतर्गत सर्व्हेमुळे, ज्यामध्ये मतदाराचा कल अंदाज बघून बदलतो आणि त्यामुळे ‘अँटिइन्कमबंसी’ असून देखील भाजपने चांगली आकडेवारी गाठली. विरोधकांना संभ्रमित करण्यासाठी असले प्रयोग मोठ्या प्रमाणावर भाजपकडून केले जातात आणि त्याचा महाराष्ट्रात तरी मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्व्हतील कल पाहून विरोधकांचे उमेदवार प्रचारात अधिक पैसा खर्च करण्यास देखील कचरतात आणि त्याचा परिणाम विरोधातील उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर होतो, हा देखील अशा अंतर्गत सर्व्हेमागील उद्देश असतो असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.

अगदी भारतीय जनता पक्षाकडे ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवाराचं नाही तिकडचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार देखील भाजपमध्ये दाखल होत आहेत आणि हेच त्या राजकीय मानस शास्त्राचे अचूक परिणाम आहे. त्यामुळे लवकरच आता लवकरच भाजपचे ठराविक ‘दरबारी पत्रकार आणि प्रसार माध्यमं’ भाजपच्या याच अंतर्गत सर्व्हेला अनुरूप आकडेवारी स्वतःच्या सर्व्हेमध्ये दाखवून, त्यावर LIVE डिबेट घडवून आणतील आणि सत्ताधाऱ्यांसाठी पोषक वातावरण पुढील महिन्याभरात निर्माण करतील, जे मागील काही वर्षांपासून चिरंतर सुरु आहे आणि त्यामुळेच विरोधक तगडा असला तरी तो कमजोर होताना दिसत आहे.

सध्या देशभर बेरोजगारी, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि रोजच्या रोज बंद होत चाललेल्या कंपन्या हे सर्व रुद्ररूप घेताना दिसत आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलासंबंधित गुन्हे हे वाढतच असताना मतदार भारतीय जनता पक्षावर यामुळे प्रचंड खुश आहे असाच त्याचा अर्थ निघतो. बेरोजगारी, महागाई, बंद पडत चालली सरकारी आणि खाजगी आस्थापन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा गंभीर समस्ये पैकी एकाविषयावरून सरकारं बदलताना देशाने पाहिलं आहे. मात्र सध्या या सर्वच गंभीर विषयांनी देशात आणि राज्यात कळस गाठलेला असताना मतदार भाजपवर प्रचंड खुश असल्याने तो भाजपाला प्रचंड मतांनी निवडून देणार आहे असा अंदाज कदाचित भाजपाने अंतर्गत सर्व्हेत वर्तविला असावा. विशेष म्हणजे भाजपाने हा अंतर्गत सर्व्हे करताना मतदाराला बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, पीक विमा योजना, पिण्याच्या पाण्याची समस्या, महिलांसंबंधित गुन्हे असा कोणत्या विषयावर प्रश्न विचारले याचा कोणताही उल्लेख किंवा माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘पेड मार्केटिंग’ तोंड वर काढणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वी भाजपाची लढत वंचित आघाडीशी असेल आणि विरोधी पक्षनेता देखील वंचितचा असेल असं खात्रीने सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने वंचितला एकही जागा दाखवली नाही हे विशेष म्हणावे लागेल.

अगदी साधं उदाहरण द्यायचं झाल्यास राज्यातील कोणत्याही प्रसार माध्यमांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरील बातम्यांवरील प्रतिक्रियांवर फेरफटका मारल्यास ९० टक्के प्रतिक्रिया या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतात. मात्र भाजपचे अंतर्गत सर्व्हे येतात तेव्हा सर्वकाही ‘भाजप-भाजप’ वातावरण झालं आहे, असा भास निर्माण केला जातो आहे. दरम्यान लवकरच भाजपचे दिल्लीश्वर अनेक ठिकाणी नारळ फोडण्याच्या बहाण्याने राज्यात दाखल होतील आणि महाराष्ट्रात जम्मू काश्मीरच्या लोकांच्या समस्या आम्ही कशा सोडवल्या यावर भाषणं देतील आणि महाराष्ट्रातील समस्या भाजपने ५ वर्षात संपवल्या आहेत असाच तोरा मिळवतील. त्यामुळे मतदाराने सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय मानस शास्त्रापासून स्वतःला वाचवणं लोकशाहीसाठी महत्वाचं आहे.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(427)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या