14 December 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

आज महाराष्ट्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्येने हादरला, ७०७४ नवे रुग्ण

Maharashtra state, Covid 19, Corona Virus Cases

मुंबई ४ जुलै: महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने हादरुन गेला आहे. २४ तासांत राज्यात ७०७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २०००६४ वर गेली आहे. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ८६७१ वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या ८३२३७ वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत ४८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.maharashtra reported covid

आज नवे रुग्ण, मृत्यूची संख्या आणि एकूण संख्या या तिनही गोष्टींमध्ये विक्रमी वाढ झाली असून प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २९५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर उर्वरित १७१ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत १० लाख ८० हजार ९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ९६ हजार ३८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ८३ हजार २९५ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरांमधली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई- २४ हजार ३९६
ठाणे- २६ हजार ७२७
पुणे- १३ हजार ५१
नाशिक-१८९०
नवी मुंबई-३०९७

 

News English Summary: Maharashtra today is once again shaken by the number of corona patients. In 24 hours, 7074 new patients have been found in the state. So the total number of patients has gone up to 200064. 295 people died today. So the total number of deaths has gone up to 8671.

News English Title: Maharashtra state Reported 7074 Covid 19 Cases today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x