27 April 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

शिंदेंच्या ठाण्यात आणि कोकणात ठाकरेंचा दबदबा, 40 आमदार 12 खासदार असूनही उद्धव ठाकरेंची शिंदेंवर आकडेवारीत मात

Maha Gram Panchayat Result 2002

Gram Panchayat Result | राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये रविवारी 1079 ग्रामपंचायतींसाठी मतदानझाले होते. त्याचा निकाल आज जाहीर झाले. यावेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले आहे.

कोकणात ठाकरे सरस :
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची जादू पाहायला मिळाली. एकूण 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. तर शिंदे गटाला फक्त 7 ग्रांमपंतायतींमध्ये यश आलं आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 98 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

कल्याणमध्ये ठाकरे :
कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली. तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातल्या 134 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडलं होतं. ठाणे जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार होत्या, पण काही ठिकाणी बिनविरोध झाल्यामुळे 134 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांमध्ये 75 ते 80 टक्के मतदान झालं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maha Gram Panchayat Result 2002 check details 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Maha Gram Panchayat Result 2002(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x