5 August 2020 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही - नारायण राणे दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
x

राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र दिनी सकाळी ६ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ट्विट करत हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. समाज माध्यमांवर राज ठाकरे यांचा प्रवेश झाल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा कार्यरत झाला आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदा फेसबुक वर इंट्री केली होती.

काही महिन्यापूर्वी त्यांनी फेसबुक पेजवर प्रवेश करून अल्पावधीतच लाखो चाहत्यांना आकर्षित केलं होत. कार्यकर्ते तसेच सामान्य मराठी माणसा बरोबर संपर्कात राहणं तसेच स्वतःचे विचार मांडणं त्यांच्यासाठी सोपं झालं आहे. याच फेसबुक पेजच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमकं बोट ठेऊन अनेक व्यंगचित्र रेखाटली आणि सामान्यांना पटली सुध्दा आहेत.

ट्विटर मुळात मायक्रो सोशल मीडिया म्हणून प्रसिद्ध आहे. कारण इथे शब्दांच्या मर्यादेमुळे स्पष्टीकरणाला जास्त वाव नसतो, त्यामुळे बरेच जण इथे येणं टाळतात किंव्हा असेल अकाउंट तरी वापरात नसतं. परंतु राज ठाकरे स्वतः ट्विटरवर अधिकृतपणे आल्याने अनेक मनसे कार्यकर्त्यांची जुनी ट्विटर अकाउंट्स कार्यरत होऊ शकतात.

टि्वटरवर राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले. त्याआधी मनसे अधिकृत या नावाने मनसेचं टि्वटर अकाऊंट आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x