29 March 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?

Narendra Modi, Raj Thackeray, MNS, Devendra Fadanvis, Ashish Shelar, Vinod Tawde

मुंबई : मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.

यावरूनच त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर आणि भाजपवर होत आहे हेच देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष मान्य केलं आणि विचलित होऊ नका असं सांगत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मागील ५-६ दिवसांपासून आशिष शेलार, विनोद तावडे आणि राज्य भाजपने ट्विट करून समाज माध्यमातून लक्ष करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यावर राज ठाकरे यांनी कानाडोळा केला, मात्र संदीप देशपांडे ते सामान्य महाराष्ट्र सैनिक असलेले तुलसी जोशी यांनी देखील मुख्यमंत्री ते आशिष शेलार यांची समाज माध्यमांवरून चांगलीच खिल्ली उडवली.

परंतु राज्यातील भाजप नेत्यांचे मूळ उद्देश राज ठाकरे यांना डिवचने असून, त्यांना मोदींच्या मुद्यापासून परावृत्त करून राज्यपातळीवरील नेत्यांवर केंद्रित करण्याची रणनीती सध्या समाज माध्यमांच्या आधारे किंवा प्रसार माध्यमांवर एखादी टिपणी करून परावृत्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आज राज्य भाजपने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे, ज्यामध्ये राज यांची २०१४ मधील भूमिका आणि २०१९ मधील भूमिका दाखविण्यात आली आहे. परंतु राज्य भाजप त्याच गोष्टी दाखवत आहे, जे स्वतः राज ठाकरे यांनी स्वतःच प्रसार माध्यमांच्या मुलाखतीत मान्य केलं आहे. पण भाजपचा खटाटोप काही कमी येताना दिसत नाही. त्यात उद्या गुढीपाडव्याची सभा असल्याने भाजप जास्तच बिथरली असून, नवं नवे प्रयोग करून काही निष्पन्न होतं आहे का, याची डिजिटल चाचपणी करताना दिसत आहेत असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x