1 March 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | चमत्कारी ICICI म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 1 लाख रुपयावर मिळाला 75 लाख परतावा Post Office Interest Rate | कुटुंबाचा महिना खर्च व्याजावर भागवेल ही योजना, बचतीवर महिना 9250 रुपये मिळतील SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 'या' 3 एसबीआय SIP योजना मोठा परतावा देतील, वेळ न घालवता बचत सुरु करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
x

मानसिक स्थितीबाबत मनसुख हिरेन यांनी पोलिसांना लेखी पत्र दिलेलं | वझेंची प्रतिक्रियाही आली

dead body, Hiren Mansukh, Kalwa Bay, Mukesh Ambani

मुंबई, ०५ मार्च: मुकेश अंबानींच्या अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत आज आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुरूवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डब्बा घेवून आला. जेवण उरकून साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानातच थांबवून मनसुख यांनी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरून गेले होते, अशी माहिती त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे. (The dead body of Hiren Mansukh found in Kalwa Bay today)

मात्र, मानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख हिरेन यांनी लेखी पत्र दिले असल्याचीही माहिती समोर येत आहे.

मनसुख ठाण्यातील क्लासिक मोटर्सची फ्रेंचायजी चालवतात. गुरुवारी ते अचानक बेपत्ता झाले होते. मात्र, एंटीलिया प्रकरणात तपास करत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाजे आणि मनसुख एकमेकांच्या संपर्कात होते, अशी शंका विरोधकांनी व्यक्त केली आहे. याच विषयाला अनुसरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे प्रत्येक यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर सचिन वाझे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनसुख हिरेनचं काय झालं मला काहीच माहीत नाही. मला आताच कळलंय. मी ठाण्यालाच चाललो आहे, असं वाझे म्हणाले.

 

News English Summary: The body of Hiren Mansukh, owner of Scorpio, was found in front of Mukesh Ambani’s Antilia residence in Kalwa Bay today. So there is only one sensation. Mansukh Hiren’s son came to the shop as usual on Thursday night at around 8 pm with a lunch box. Mansukh had stopped the boy in the shop at around 8.30 am after finishing the meal and told him that he was going out on a two-wheeler, said an employee of his shop.

News English Title: The dead body of Hiren Mansukh found in Kalwa Bay today news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x