५ वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत: राज ठाकरे
मुंबई: विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय ‘हीच ती वेळ’, यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग ५ वर्षे वेळ नव्हता का? गेली ५ वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावर राज ठाकरेंनी टीका केली. पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, सरकारमध्ये राहून नुसत्या धमक्या दिल्या. पैशाचं काम अडलं की केवळ आर्थिक हितसंबंधांसाठी राजीनाम्याची धमकी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून दिली गेली, असा आरोप राज ठाकरेंनी केला. आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे रातोरात तोडली. लोकांनी आक्रोश केला मात्र उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यावर आरे जंगल म्हणून घोषित करु. आता काय तिकडे गवत लावणार? शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळही नाही, तुम्हाला मुर्ख बनवत आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
सभेतील मुद्दे;
- माझी तळमळ समजून घ्या, सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मत द्या
- सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष हवा
- भ्रष्टाचाराचे गुन्हे असलेले लोक पुन्हा निवडून येत असतील, तर बदल काय झाला
- काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच भाजपमध्ये गेलाय
- आरे का कारे करण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत हवा
- अटकेपार झेंडा फडकवणारा महाराष्ट्र हतबल का
- महाराष्ट्रातील मंत्रालयात लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी का लावली जात नाही
- ममता बॅनर्जी यांच्या मंत्रालयातील लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीमधून गाणी लावली जातात
- मनसेच्या आंदोलनामुळे तत्कालीन पोलीस आयुक्तांची हकालपट्टी
- गुजरातमधून २० हजार परप्रांतीयांना हुसकावून लावलं, तेव्हा कुणावरही केसेस झाल्या नाहीत
- मनसेच्या आंदोलनामुळे मराठी चित्रपटांना थिएटर्समध्ये स्क्रीन उपलब्ध
- रजा अकादमीविरोधात मनसेने आंदोलन केले
- मनसेच्या आंदोलनानंतर ७८ टोलनाके बंद
- मनसेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त झाली
- प्रभादेवी स्थानकावरील घटनेनंतर मनसे सैनिकांनी अतिक्रमणे हटवली
- हातात घेतलेलं कोणतंही काम अर्थवट सोडलेले नाही
- शिवछत्रपतींची भूमी म्हणून महाराष्ट्र आणि मराठीची ओळख
- सरकार शिव स्मारकाची जागा पुन्हा दाखवू शकेल का
- शिवाजी महाराजांचं स्मारक उभे करण्यापेक्षा त्यांच्या गड किल्ल्याची अवस्था सुधारा
- रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ६०० कोटी रुपये खर्च करणार; हे पैसे आणणार कुठून
- मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ४८ टक्के रेल्वे रिकाम्या, मग या मार्गावर बुलेट ट्रेनचा अट्टाहास का
- बुलेट ट्रेनचं कर्ज सामान्यांच्या माथी मारलं जातंय
- शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एकही ओळ नाही
- न्यायालयावर विश्वास ठेवायचा की नाही, हा प्रश्न पडतो
- न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत निर्दयीपणे झाडं कापली
- सरकारच्या संगनमतानं न्यायालये निर्णय देतात
- तुमचा कितीही बट्ट्याबोळ झाला तरी तुम्ही भावनेच्या आधारेच मतदान करणार
- भावनिक मुद्द्यांवर राज्यात मतदान होतं
- नाशिकमध्ये जाऊन खड्डे पडलेत का ते दाखवा
- कलम ३७० चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, महाराष्ट्रातील प्रश्नांवर कुणी का बोलत नाही
- अब की बार मोदी सरकार मग उद्योगधंदे बंद का पडताहेत
- पाच वर्षांनंतरही जनता खड्ड्यातच
- मुख्यमंत्र्यांची सुरू होण्याआधी भाजपचा टी शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या
- यवतमाळ जिल्ह्याची ओळख आज सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा अशी आहे
- यासाठी तुम्ही उन्हा-तान्हात उभे राहून मतदान करता का
- आहेत नोकऱ्या जात असताना नवा रोजगार मिळणार कसा
- जबाबदारी झटकणाऱ्यांना तुम्ही मतदान करता; राज ठाकरे यांची विचारणा
- बँका बुडल्यावर सरकार आणि रिझर्व्ह बँक जबाबदारी झटकतात
- एकाच कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्यावर कोणाचे नियंत्रण का नाही
- स्थानिक न्यायासाठी मनसेकडे येतात, सरकारकडे जात नाहीत
- सिटी बँकेच्या संचालक मंडळात शिवसेनेचे अडसूळ
- देशभरातील २ कोटी लोकांचे रोजगार गेले
- नोटबंदीचा निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल; मी तेव्हाच सांगितले होते
- देश चालवता येत नाही म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतले
- लोकांच्या लाखोंच्या ठेवी एका दिवसात बुडतात
- यांची पैशाची कामे अडली की, राजीनाम्यांचं टूम
- गेल्या पाच वर्षांत राजीनामे देण्याच्या केवळ धमक्या दिल्या
- शिवसेनेच्या हीच ती वेळ या घोषवाक्यावरून राज ठाकरे यांची टीका
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला थोड्याच वेळात होणार सुरुवात
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News