26 April 2024 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

कोरोना आपत्ती | मुंबईकरांसाठी थेट परदेशातून लसी मागवण्यासंदर्भातील चाचपणी सुरु

मुंबई, ११ मे | राज्याच्या कोरोनास्थितीबाबा एक अत्यंत दिलासादायक बातमी येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात वाढलेले संसर्ग आता नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत असून राज्यतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत आहे. राज्यातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा तब्बल महिन्याभराहून अधिक काळानंतर आज (१० मे) थेट ४० हजारांच्या खाली गेला असून राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार २३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल ६१ हजार ६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकड्यातली लक्षणीय घट तर दुसरीकडे कोरोनमुक्तांचा मोठा आकडा ही राज्यासाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे.

दरम्यान, सध्या राज्य सरकारने तुटवडा असला तरी लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा लस तुटवडा भरुन काढण्यासाठी परदेशातून लसी मागवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. करोना लसीकरण मोहीम सुरळीत आणि जास्त प्रभावीपणे पार पडावी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी मुंबईचा पालकमंत्री या नात्याने चर्चा केली. त्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेला परदेशातून (मुंबईकरांसाठी) लसी मागवता येईल का यासंदर्भातील शक्यता तपासून पाहण्यास सांगितलं आहे,” असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: Currently, the state government is pushing for a vaccination campaign despite the shortage. Mumbai’s Guardian Minister Aditya Thackeray has commented on ordering vaccines from abroad to fill the shortage. As the Guardian Minister of Mumbai, I had a discussion with the Chief Minister of the State, Uddhav Thackeray, regarding the smooth and effective conduct of the Corona Vaccination Campaign.

News English Title: Mumbai BMC is considering about to import corona vaccine from foreign countries for Mumbaikars news updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x