16 July 2020 12:40 AM
अँप डाउनलोड

भाजपचा १ तर काँग्रेस-जेडीएसचे ४ आमदार गायब ?

कर्नाटकात भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तासच उरले असताना १ नवीनच धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे ४ आमदार तर भाजपचा १ आमदार चक्क गायब झाले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसचे प्रत्येकी दोन आमदार शपथ घेण्यासाठी विधानसभेत पोहोचलेच नाहीत. तर भाजपचा एक आमदारही बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

आज कर्नाटक विधानसभेत सर्व आमदार शपथविधीसाठी उपस्थित आहेत फक्त ५ आमदार सोडून जे बेपत्ता आहेत. आणि हे बेपत्ता आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस मतदान करतील कि नाही याबाबत मात्र शंका आहे. ‘भाजप आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सर्वच पाहत आहेत’, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी केला. आणि आमच्या पक्षाचे सर्व आमदार आम्हालाच मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकूण काय तर कर्नाटकात चाललेला राजकारणाचा घोडेबार काय निर्णय देईल हे आपल्याला काही क्षणातच कळेल. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताफ्यात असलेले १८ लिंगायत आमदार भावनिक मुद्यावर स्वतः लिंगायत असलेल्या येडुयुरप्पाना समर्थन देतील तर नवल वाटायला नको. लिंगायत मठांमध्ये जाऊन भाजपने याआधीही त्यांना भावनिक आव्हान करून आपल्याला समर्थन देण्याची विनंती केली होती.

कर्नाटकातील सत्तासंघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना संध्याकाळी ४ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x