13 May 2021 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

त्या चिमुकलीवर मंदिरातच बलात्कार झाला होता, फॉरेन्सिक अहवाल

नवी दिल्ली : कठुआ बलात्कार प्रकरणी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला आहे. मंदिरात मिळालेले रक्ताचे डाग पीडित मुलीचेच असून त्या चिमुकलीवर मंदिरातच बलात्कार झाल्याचं या फॉरेन्सिक लॅब अहवालातून स्पष्ट झालं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

फॉरेन्सिक लॅबने कठुआ घटनेचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सादर केला आहे. त्याच मंदिरात पीडित मुलीची केस सुद्धा आढळले असून त्याची खोलवर तपासणी केली असता तिचा डीएनए प्रोफाइल प्रमुख आरोपींमधील शुभम सांगरा याच्याशी मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच त्या चिमुकलीच्या कपड्यावर मिळालेले रक्ताचे डाग सुद्धा तिच्या डीएनए प्रोफाइलशी मिळत असून त्या चिमुकलीच्या गुप्तांगाजवळ रक्त आढळून आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसआयटी पथकाला पुरेसे पुरावे नसल्याने तपासात अडचणी येत होत्या, कारण आरोपीने पोलिसांशी हात मिळवणी करून पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नं केला होता. पुराव्या अभावी एसआयटीला आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नव्हता. अखेर काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाला विनंती करून दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब द्वारे पुराव्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर हा अहवाल समोर आला आहे त्यामुळे गुन्हेगारांच पितळ उघडं पडलं असून त्या चिमुकलीला भविष्यात न्याय मिळेल असे पुरावे पोलीस यंत्रणा उभे करत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x