29 April 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

सामान वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला ई-पासची गरज नाही | केंद्राचे राज्यांना निर्देश

Lift All Restrictions, Inter State Movement Of Cargo. Union Government

मुंबई, २२ ऑगस्ट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही समोर आलं. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने हे निर्देश जारी केले आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहून निर्दश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे की, “केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको,” असं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The lockdown imposed on the corona background is being phased out. As part of this, the central government has made it clear that e-passes will no longer be required for luggage and passenger transport anywhere in the country.

News English Title: Lift All Restrictions On Inter State Movement Of People Cargo Union Government Tells States News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x