4 December 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

काय लॉक आणि काय अनलॉक! हे सरकार पूर्णपणे कन्फ्युज - देवेंद्र फडणवीस

Unlock 2, Covid 19, Corona Virus, Devendra Fadnavis

अकोला, 29 जून: राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारचं ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू आहे. त्यामुळे ‘अनलॉक 2’ मध्ये कमालीचा गोंधळ आहे. सरकारच पूर्णपणे कन्फ्युज आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय लॉक आणि काय अनलॉक आहे, हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती आणि अकोल्यातील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आली आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. सरकारने 100 युनिटांपर्यांतच बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते तर दूर आता तीन टप्प्यात वीज बिल वलूल करण्यात येणार आहे. परंतु सरकारनं त्याबाबतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.

कापूस खरेदीमध्ये शासनाला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कापसाची खरेदी झालेली नाही. यासाठी व्यवस्था वाढवा. या मुद्द्याशिवाय बोगस बियाण्यांमुळेही शेतकरी अडचणीत आलेला आहे. बियाणे कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात भरमसाट बिल येत असल्याने अ‍ॅव्हरेज बिलात सूट मिळाली पाहिजे. शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही. बँकांसोबत करारनामे झालेले नाहीत. यामध्ये बँकांनाही अनेक अडचणी आल्याने थकबाकीदार शेतकºयांना कर्ज मिळाले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

पत्रपरिषदेला शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे, खासदार रामदास तडस, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, आमदार रवि राणा, माजी आमदार अनिल बोंडे, सुनील देशमुख, शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

 

News English Summary: The lockdown in the state has been extended till July 31. The state government’s ‘Mission Again Again’ is underway. So there is a lot of confusion in ‘Unlock 2’. The government itself is completely confused said Devendra Fadnavis.

News English Title: What Is Unlock 2 Please Clear This Thing Asks Devendra Fadanvis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x