2 July 2020 10:55 AM
अँप डाउनलोड

आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले, 78 रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, २९ जून : आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या 48 तासात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील 103 आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा 4.48 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

आज राज्यात 2385 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 88,960 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 52.37 टक्क्यावर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 5,74,093 लोकं होम क्वारंटाईन असून 37,758 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या 73,298 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 169883 Today, newly 5257 patients have been identified as positive. Also newly 2385 patients have been cured today, totally 88960 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 73298.

News English Title: Today newly 5257 patients have been identified as positive in Maharashtra News latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(952)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x