12 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Cryptocurrency Investment | भारतीयांमध्ये क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक वाढतेय | काय सांगतो रिपोर्ट

Cryptocurrency Investment

मुंबई, 31 ऑक्टोबर | जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांनासध्या भारतात कायदेशीर मान्यता नसली तरी भारतीयांमध्ये या आभासी चलनाची क्रेझ मात्र वाढली आहे. भारतात क्रिप्टो करन्सीची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने दक्षिण आशिया आणि ओशियाना परिक्षेत्र जगातील वेगाने वाढणारी डिजिटल करन्सीची बाजारपेठ ठरली आहे. Chainalysis या संस्थेच्या रिपोर्टनुसार (Cryptocurrency Investment) मागील १२ महिन्यात भारतात क्रिप्टो करन्सी बाजाराची उलाढाल तब्बल ६४१ टक्क्यांनी वाढली आहे.

Cryptocurrency Investment. Although cryptocurrency transactions, which have become a topic of discussion around the world, are not legally recognized in India at present, the craze for this virtual currency has increased among Indians :

क्रिप्टो करन्सीची बाजारपेठ आणि गुंतवणुकीचा अंदाज यांच्या जूनपर्यंतच्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेऊन हा रिपोर्ट Chainalysis ने तयार केला आहे. यामध्ये भारतसह पाकिस्तान, व्हिएतनाम या देशात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांचा आढावा घेण्यात आला. विकेंद्रित वित्तीय मंचावरील आर्थिक व्यवहारांमध्ये भारतातील व्यवहारांचा हिस्सा ५९ टक्के आहे. पाकिस्तान आणि व्हिएतनामच्या तुलनेत तो अधिक असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

एक कोटी डॉलर्सच्या क्रिप्टो करन्सीच्या हस्तांतर व्यवहारांमध्ये ४२ टक्के व्यवहार हे भारतातील पत्त्यांवर झाले आहेत. या आकडेवारीवरून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या मागील वर्षभरात प्रचंड वाढली असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे Chainalysis ने असे म्हटले आहे कि क्रिप्टो करन्सीचे व्यवहार कर कक्षेत आणावे का याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे.

वाॅलेटवर मिळणार विमा संरक्षण:
भारतात बनविलेल्या क्रिप्टो एक्सचेंज बिट्झ नुकताच सुरु करण्यात आला. बीट्सझने डिजिटल अॅसेट मॅनेजमेंटमध्ये नेतृत्व असलेल्या, फायरब्लॉक्स सोबत भागीदारी केली आहे. ते वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या वाॅलेटवर विमा प्रदान करेल. यासोबतच व्यासपीठावर ३० दशलक्ष व्यवहारांना अनुमती देणारे बीट्सझ हे सर्वाधिक वेगवान एक्सचेंज बनेल, असा दावा कंपनीने केला आहे.

सध्या भारतात अनेक युवा तरुण आणि क्रिप्टो गुंतवणूकदार बिट्झ मध्ये प्रचंड रुची दाखवीत आहेत. सध्या या प्लॅटफॉर्मवर १ दशलक्षहून अधिक ट्रेड प्रमाण आहे, त्यात ५ हून अधिक एक्सचेंजेस लिस्टेड आहेत आणि दोन हजारांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cryptocurrency Investment craze for this virtual currency has increased among Indians.

हॅशटॅग्स

#Bitcoin(59)#Cryptocurrency(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x