28 June 2022 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा हस्तक जबीर मोतीला लंडनमध्ये अटक

लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक जबीर मोती याला लंडन पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. स्थानिक माध्यमांकडून हाती येत असलेल्या माहितीनुसार जबीर मोती’च्या अटकेची भारताकडूनच मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे भारत सरकारसाठी हे मोठं यश मानण्यात येत आहे. जबीर मोती हा मूळचा पाकिस्तानी नागरिक असून त्याची डी-कंपनीच्या महत्वाच्या आर्थिक व्यवहारांत महत्वाची भूमिका असते. त्याला लंडनच्या हिल्टन हॉटेलमधून अटक करण्यात आले. त्यामुळे हा दाऊद इब्राहिम’साठी सुद्धा मोठा धक्का मानला जात आहे.

त्याला दहा वर्षांच्या व्हिसावर ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्याची मुभा होती. तो पाकिस्तान, मध्य पूर्व देश, ब्रिटन, युरोपचा काही भाग, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियातल्या देशांमधली दाऊद इब्राहीमची महत्वाची कामं सांभाळत होता. त्या आर्थिक व्यवहारातील पैसा हा भारतविरोधातील कारवायांसाठी वापरला जात असल्याचा भारत सरकारचा संशय होता. डॉन दाऊदच्या कुटुंबाला ब्रिटनमध्ये हलवण्याचा पर्याय शोधण्यात जबीर मोतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुढे भारत सकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी काही हालचाली करण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x