28 September 2020 9:31 PM
अँप डाउनलोड

जो पक्ष २०१९ च्या निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च करेल तोच पक्ष जिंकेल: कपिल सिब्बल

नागपूर : काल काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे नागपूर दौऱ्यावर आले असता ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीतील संघर्ष’ या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या परिसंवादात त्यांनी आगामी निवडणुकीच वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच आरएसएस’वर टीका करताना सिब्बल म्हणाले की, देशावर सध्या नागपुरातून नियंत्रण ठेवले जात आहे. नागपुरातून देशभरात विशिष्ट विचारसरणीचा प्रचार केला जात असल्याचा थेट आरोप सुद्धा त्यांनी आरएसएस’वर आणि केंद्र सरकारवर केला.

दरम्यान पुढे ते म्हणाले की, १९५० नंतर पहिल्यांदाच सरकार व एखादा पक्ष यांच्यात अंतर नसल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे. तसेच ही स्थिती भविष्यासाठी निश्चितच चिंताजनक असून, २०१९ च्या निवडणूकीत बक्कळ पैसा खर्च करणारा पक्षच जिंकेल असे जाहीर वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. परंतु कपिल सिब्बल यांनी या परिसंवादात भाग घेऊन थेट नागपुरातच आरएसएस’वर निशाणा साधला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(402)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x