13 December 2024 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी खाली आली आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

गुरुवारी एचएएल स्टॉक 5.88 टक्क्यांच्या घसरणीसह 5015.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 3.11 टक्के घसरणीसह 4,859.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म इनक्रेडच्या तज्ञांच्या मते, एचएएल कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन खूप जास्त झाले आहे. त्यामुळे हा स्टॉक किंचित खाली येऊ शकतो. तज्ञांनी 7 जुलै रोजीच्या अहवालात एचएएल कंपनीची Dassault Aviation शी तुलना केली होती. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 519 दशलक्ष डॉलर्स महसूल आणि 974 दशलक्ष डॉलर्स नफा कमावला होता. तर एचएएल कंपनीने 367 दशलक्ष डॉलर्स महसूल आणि 921 दशलक्ष डॉलर्स नफा कमावला होता. एचएएल कंपनीच्या शेअर्सचे एंटरप्राइझ मूल्य 4100 कोटी डॉलर्स आहे. तर Dassault Aviation कंपनीचे मूल्य 670 कोटी डॉलर्स आहेत.

पुढील दोन वर्षांमध्ये Dassault Aviation कंपनीचा महसूल 24 टक्के CAGR दराने वाढू शकतो. तर कंपनीची कमाई 12 टक्के CAGR दराने वाढू शकते. आणि एचएएल कंपनीचा महसूल 13 टक्के सीएजीआर आणि कमाई 8 टक्के सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. 2023 मध्ये Dassault Aviation कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4100 कोटी डॉलर्स होता. तर HAL कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1100 कोटी डॉलर्स होता.

एचएएल कंपनीच्या शेअर्सचा आढावा घेणाऱ्या 16 तज्ञापैकी 14 जणांनी एचएएल स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एका तज्ञाने स्टॉकवर ‘HOLD’ आणि एकाने ‘SELL’ अशी रेटिंग जाहीर केली आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी एचएएल स्टॉक 1767.95 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर पोहचला होता. त्यानंतर अवघ्या 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 221 टक्क्यांनी वाढली होती. 9 जुलै 2024 रोजी एचएएल कंपनीच्या शेअर्सने 5,675.00 रुपये ही आपकी विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून 11.62 टक्के घसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 19 July 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x