23 September 2021 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

PMC बँक ग्राहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सरकारमुळे चिमुकल्याने त्याचा बाबा गमावला

PMC Bank, PMC Bank Fraud, RBI, Punjab and Maharashtra Co operative Bank, HDIL, HDIL Scam

मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक घोटाळ्यातील खातेदार संजय गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संजय गुलाटी यांच्या कुटुंबाचे तब्बल ९० लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी संजय गुलाटी यांनी स्वतःची जेट एअरवेजची नोकरी गमावली होती आणि आता आयुष्यभर कमावलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्याने आणि सरकारची जवाबदारी झटकण्याची बातमी पाहून ते मागील काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. मात्र तोच धक्का असह्य झाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष सोमवारी संजय गुलाटी किल्ला स्वतः देखील कोर्टासमोर झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. पण दुपारी घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँकेच्या बचत खातेदारांच्या पैसे काढण्याची मर्यादा ६ महिन्यांत २५,००० रुपयांवरून ४०,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या ग्राहकांसाठी प्रत्येक खात्यातुन पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. केंद्रीय बँकेने पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबर रोजी अनेक निर्बंध घातले. त्याच वेळी, प्रत्येक ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा ६ महिन्यांत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आरबीआय’च्या निर्णयावर कडक केली जातं आहे.

आरबीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बँकेच्या रोख स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही मर्यादा ४०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की या निर्णयानंतर पीएमसी बँकेतील सुमारे ७७ टक्के ग्राहक त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकतील.

दरम्यान, मुंबईच्या स्थानिक कोर्टाने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ​​(एचडीआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग आणि माजी बँकेचे अध्यक्ष वरम सिंग यांच्या पोलिस कोठडीत सोमवारी १६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. शेकडो ठेवीदार या प्रकरणाला ‘व्हाईट कॉलर गुन्हा’ म्हणत कोर्टाबाहेर निषेध करत आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँक प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना सोमवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x