30 April 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

विरोधक यूपीतील विकास कामं रोखून जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत - योगी आदित्यनाथ

Communal Riots, CM Yogi Adityanath, Hathras Gangrape

लखनऊ, ४ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विरोधकांकडून धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिलेले आहेत. तर, विरोधकांकडून आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत असे त्यांनी म्हटले आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर नाव न घेता गंभीर आरोप लावले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधक उत्तर प्रदेशात जातीय दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचत आहेत. राज्यातील विकास कामं रोखण्यासाठी विरोधक असं राजकारण करत आहेत. ज्यांना विकास होत असलेला आवडत नाहीत असे लोक देशात आणि राज्यात जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दंगलीच्या माध्यमातून राज्यातील विकास थांबेल आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी मिळेल असं विरोधकांना वाटत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: The political atmosphere has heated up after the incident of gang rape in Hathras in Uttar Pradesh. Chief Minister Yogi has ordered a CBI probe into the matter. Opposition groups called for a boycott of the assembly. Against this backdrop, Yogi Adityanath has now targeted the opposition. He has said that those who do not like development want to provoke communal riots.

News English Title: Those Who Do Not Like Development Want To Provoke Communal Riots CM Yogi Adityanath Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x