21 October 2019 4:17 PM
अँप डाउनलोड

‘हे तर दहशतवादीच’; स्वरा भास्करची आरएसएस'वर टीका

केरळ : शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून केरळमध्ये कायदा सुव्यवस्थेवरून तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने-आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना सर्वात मोठं हिंसक वळण मिळाले ते केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर ४ गावठी बॉम्ब फेकण्यात आले. धक्कादायक म्हणजे संबंधित पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे संशयित हे आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, याच घटनेचा दाखला देत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाज माध्यमांवरून जोरदार टीका केली आहे. ‘पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. यांनासुद्धा फाशीची शिक्षा होणार का? भगवा दहशतवाद हा खरा आहे,’ अशा शब्दांत स्वराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

केरळ राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. कन्नूर, पेराम्ब्रा, मलापुरम, अदूर या भागात अनेक ठिकाणी पूर्वनियोजित हिंसाचार झाला आहे. तेथे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सुद्धा काही हल्ले झाले. कन्नूर आणि राज्यातील इतर भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून राज्याचे पोलिस प्रमुख लोकनाथ बेहेरा यांनी राज्यव्यापी सतर्कता इशारा पोलीस यंत्रणेला दिला आहे.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या