27 July 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

बेरोजगारीत अडीज वर्षातील सर्वाधिक वाढ: सीएमआयई अहवाल

Unemployment, India

नवी दिल्ली : भारतातील बेरोजगारीचा दर वाढला असून मागील २.५ वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचे सिद्ध झालं आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सीएमआयईच्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये मासिक बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ५.९ टक्के होता, तो यंदा ७.२ टक्के एवढा वाढला आहे.

सीएमआयई या सस्थेकडून प्रत्येक महिन्याला बेरोजगारीसंदर्भातील अहवाल सादर करण्यात येतो. अनेक अर्थतज्ञांच्या टीमकडून या संस्थेच्या अहवालाची पडताळणी होत असते. त्यानुसार, फेब्रुवारी २०१९ चा बेरोजगारी अहवाल या संस्थेकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून फेब्रुवारी महिन्यातील बेरोजगारी वृद्धीचा दर ७.२ हा गेल्या अडीज वर्षातील सर्वाधिक ठरला आहे. तर दुसरीकडे सप्टेंबर २०१६ मध्ये बेरोजगारी वृद्धीचा दर ५.९ टक्के एवढा राहिला होता.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार दिल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, बेरोजगारीची वाढती आकडेवारी नरेंद्र मोदी सरकारला डोकेदुखी ठरू शकते. याआधी देखील एका अहवालातून मागील ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात असल्याचं स्पष्ट झालं होतं. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने सदर अहवाल त्यावेळी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचं सांगत आरोप फेटाळले होते. नोटबंदी आणि GST या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळेही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x