25 July 2021 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला; सुप्रीम कोर्टात माहिती

Rafale Fighter Jet, Supreme Court, Narendra Modi

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पंतप्रधान कार्यालयानं राफेल लढाऊ विमानांच्या डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचं वृत्त याआधी ‘द हिंदू’ वृत्तपत्रानं दिलं होतं. काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे ‘द हिंदू’नं हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. संबंधित कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती स्वतः महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टाला दिली. ‘द हिंदू’नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचं वृत्त दिलं, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. यानंतर याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला. केंद्र सरकारनं कोर्टाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप यावेळी प्रशांत भूषण यांनी केला.

महाधिवक्त्यांनी कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांची कानउघाडणी केली. ‘कागदपत्रं चोरीला गेल्यानंतर सरकारनं काय पावलं उचलली?,’ असा प्रश्न गोगोई यांनी महाधिवक्त्यांना विचारला. महत्त्वाची माहिती असलेल्या फाईल चोरीला गेल्यानंतर सरकारनं काय केलं, याचा पूर्ण तपशील आज दुपारी 2 वाजता द्या, अशा सूचना सरन्यायाधीशांनी महाधिवक्त्यांना दिल्या. यावेळी युक्तीवाद करताना महाधिवक्त्यांनी कागदपत्रांच्या चोरीसाठी ‘द हिंदू’ला जबाबदार धरलं. द हिंदूनं संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्वत:च्या सोयीनं वापर केल्याचा आरोपदेखील सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1609)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x