20 April 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Health First | म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे

Eating, Watermelon, Summer season, beneficial

मुंबई, २८ फेब्रुवारी: कडक उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते. अशावेळी लालबूंद गर असलेली कलिंगड ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. ही कलिंगड उन्हापासून आपल्या शरीराची होणारी लाही लाही रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळापुरता थंडावा पोहोचवत असले तरी कलिंगड हे शरीराला आतून थंड करणारं नैसर्गिक कुलर असल्याचं म्हणता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करा. (Eating Watermelon in summer season is beneficial health article)

तीव्र उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी कलिंगड शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून काढतात. (Watermelons make up for the loss of minerals in the human body)

मात्र त्याचबरोबर कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. उन्हाळ्यात कामानिमित्त तुम्ही बाहेर असाल तर छोट्याशा डब्ब्यात कलिंगडाच्या फोडी सोबत ठेवाव्यात. घामामुळे होणारं जलउत्सर्जन कलिंगड भरून काढतं. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे.

कडक उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी उन्हातून घरी आल्यानंतर कलिंगडाचा आतला गर काढून त्याची साल डोक्यावर ठेवावी. यामुळे थंडावा वाढतो. त्याचप्रमाणे प्रखर उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास कलिंगडाची साल डोळ्यावर ठेवल्यानं डोळ्याला थंडावाही मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यात मिळणारं हे फळ आवर्जून सर्वांनीच खावं.

 

News English Summary: During the hot summer days, intense heat causes limbs to swell. At such times, you can see watermelons with reddish hues everywhere. These watermelons are more beneficial in preventing sunburn of your body. Although AC, fan, cooler keep your body cool from outside for some time, it can be said that Watermelon is a natural cooler that cools the body from inside. Therefore, consume watermelon in summer.

News English Title: Eating Watermelon in summer season is beneficial health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x