19 April 2024 11:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

शिंदे गटातील आमदारांचा उन्मत्तपणा शिगेला, आमदार बांगर यांनी मतदारसंघातील गावकऱ्याच्या कानाखाली लगावली

Shinde Camp MLA Santosh Banger

Shinde Camp MLA Santosh Bangar | चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून आरोप, प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. तर मागील काळापासून शिंदे गटातील अनेक आमदारांचा उद्दामपणा राज्यातील लोकं पाहात आहेत. त्याचा पुढचा टप्पा आता सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या जत्रेत राजकीय पुढाऱ्यांना बोलवल जात नाही. मात्र आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर दर्शनासाठी आले. यावेळी गावकऱ्यांनी परंपरेचा दाखला देतं त्यांना रोखलं. आपण जत्रा संपल्या नंतर दर्शनाला यावं, अशी विनंती गावकऱ्यांनी केली.

त्यानंतर गावातील आमदार बांगर समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांच्या समोर आले आणि दोन गटांमध्ये तू – तू, मै – मै झाली. याच वादात बांगर यांनी एका गावकऱ्याच्या कानाखाली लगावली. वाद वाढल्याचं पाहुन काही स्थानिकांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेतलं. यावर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायला लागलं तर जनतेचा उद्रेक होतोच, गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती योग्यच होती. ज्यांना गावच्या भावना समजत नाहीत तो राजकारणामध्ये कच्चा आहे, असा टोलाही बबन थोरात यांनी आमदार संतोष बांगर यांना लगावला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp MLA Santosh Banger in controversy again check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Shinde Camp MLA Santosh Banger(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x