15 December 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health First | रात्री डाळ खाणे चुकीचे आहे? | वाचा सविस्तर

Inclusion of pulses,Daal, health article

मुंबई, ०९ मार्च: आरोग्यासाठी फायदेशीर अशा सर्व घटकांनी युक्त आहार डाळींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच चांगल्या आहारासाठी आपल्या आहारात डाळीचा समावेश खूप महत्वाचा असतो. रोजच्या जेवणात डाळ हा घटक असायलाच हवा. डाळीया प्रोटीनचा मोठा स्रोत असतात आणि पचायलाही खूप सोप्या असतात. एक कप डाळ खाल्ल्याने १८ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक आढळते. एक कप डाळीतून शरीराला एका दिवसासाठी लागणाऱ्या लोहाची गरज पूर्णपणे भरून निघू शकते. (Inclusion of pulses Daal in our diet is very important for a good diet news health article)

डाळ खाणे शरीरासाठी खूप लाभदायक:
डाळ खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याने आपल्या शरीराला लागणारे जवळपास सर्व घटक एकत्र मिळतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. डाळीने आपल्या शरीराचे वजन वाढने थांबते आणि कफ आणि पित्तासारख्या समस्यांनाही दूर ठेवायला ती मदत करते. डाळीने रक्तातील सर्व विकार दूर होतात आणि त्यामुळे त्वचेच्या सर्व समस्यांपासून आपणास सुटका मिळते.

डाळी आरोग्यासाठी फायदेशीर:
मसुराची डाळ ही पचनासाठी एकदम हलकी आणि पौष्‍ट‍िक असते. तुरीच्या डाळींने तुम्ही डायबिटीज २, कँसर, ह्रदयाचे विकार दूर ठेऊ शकता. डाळी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्यामुळे आपल्याला होणारे सर्दी, ताप, खोकला यांसारखे साधे वाटणारे पण गंभीर स्वरूप घेणारे आजार आपल्यापासून दूर राहतात.

डाळ रात्रीच्या वेळी खाणे योग्य आहे का?
काही लोकांचे असे मत असते की रात्रीच्या वेळी डाळ खाल्ल्याने ती पचत नाही आणि त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदात जेवणासंबंधीत नियम बनवण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे म्हणजेच दोषाकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या प्रकृतीवर म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांवर होतो.

प्रत्येक धान्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्याचा शरीरावरील प्रभावही त्यानुसार बदलत जातो. तज्ञांच्या मतानुसार रात्र डाळ खाल्ल्याने काही नुकसान होत नाही. परंतु, यावेळी ज्या डाळी पचायला सोप्या आहेत अशा डाळींचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरते. रात्रीसुद्धा अवेळी डाळ खाल्ल्याने अपचन होऊ शकते आणि त्यामुळे पित्ताचा त्रास संभवतो.

तूरीची डाळ , हरभऱ्याची डाळ आणि वटाण्यची डाळ पचन्य़ासाठी जड असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी या डाळी खाणे टाळावे. याउलट रात्रीच्या जेवणात मुगाच्या किंवा उडदाच्या डाळीचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे रात्रीच्या वेळी केवळ डाळच नाही तर पचनासाठी जड असणारे सर्वच पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

 

News English Summary: A diet rich in all the elements that are beneficial for health cannot be complete without pulses. That is why the inclusion of pulses in our diet is very important for a good diet. Dal should be an ingredient in daily meals. Pulses are a great source of protein and are also very easy to digest. Eating a cup of dal gives your body 18 grams of protein. Pulses are rich in iron, magnesium and zinc. One cup of pulses can completely meet the daily requirement of iron required by the body.

News English Title: Inclusion of pulses Daal in our diet is very important for a good diet news health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x