27 April 2024 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लसीकरणात देशातील नागरिकांना प्राधान्य द्यायचं सोडून जगभरात का वाटताय ते बोला आधी - राष्ट्रवादी

Minister Jayant Patil, Narendra Modi, Prakash Javadekar, vaccination

मुंबई, १७ मार्च: देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.

मात्र आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जावडेकरांना उत्तर दिलं आहे. आधी देशातील लोकांचे लसीकरण करावे आणि मग केंद्र सरकारने इतर देशांना मदत करावी असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जावडेकरांनी आधी देशात निर्माण होणाऱ्या लसी देशातील नागरिकांना प्राधान्य क्रमाने देण्याऐवजी जगभरात का वाटल्या जात आहेत याचं उत्तर द्यावं, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

 

News English Summary: NCP state president Jayant Patil has given an answer to Javadekar. “People in the country should be vaccinated first and then the central government should help other countries,” Jayant Patil told reporters. Tolahi Patil also demanded that Javadekar, who has questioned the vaccination in Maharashtra, should answer why the vaccines being produced in the country are being distributed all over the world instead of giving priority to the citizens of the country.

News English Title: Minister Jayant Patil reply to Modi govt over statement made by Prakash Javadekar on vaccination program news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x