27 September 2022 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

Viral Video | मुलींसाठी तिचा जन्मदाता बापाचं खरा सुपरमॅन असतो हे खरंच आहे, हा व्हायरल व्हिडिओ तेच सांगतोय

Viral Video

Viral Video | असं म्हटलं जातं की, मुलींसाठी त्यांच्या वडिलांपेक्षा मोठा सुपरहिरो नाही. आपलं मूल कायम आनंदी राहावं, यासाठी वडील आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. ते स्वत: संकटात जगतात, परंतु स्वतःच्या मुलांना कोणताही त्रास होऊ देत नाहीत. मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येताना दिसलं तर ते स्वत:वर ते संकट घेतात. बाप-लेकीचं नातं असंच काहीसं असतं. हेच नातं दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काहीजण रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभे असतात :
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला काही लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलताना दिसतील. काही सेकंदात असं काही घडतं की काहीजण रस्त्याच्या कडेला उभे राहून एकमेकांशी गप्पा मारत उभे असतात. नेमकं त्याच वेळी त्यातील एकजण इकडेतिकडे बघण्यासाठी मान वळवतो, तेव्हाच त्याची नजर सायकलिंग करणाऱ्या आपल्या मुलीवर पडते. व्हिडिओत दिसत आहे की, सायकल चालवताना मुलगी सायकलवरील नियंत्रण गमावून बसली असून ती समोर असलेल्या सुसाट लोखंडी पोलच्या दिशेने जाऊन जोरदार आदळून अपघाताची बळी पडणार होती. मात्र लोखंडी पोलच्या काही अंतरावर उभे असलेल्या त्या वडिलांची तिच्यावर नजर जाते आणि तिचे वडील तिला एखाद्या सुपरमॅन प्रमाणे जराही इजा होणार नाही अशी काळजी घेत वाचवतात.

तर तिचा गंभीर अपघात झाला असता :
व्हिडिओ पाहून स्पष्ट सांगता येईल की, जर वडिलांनी वेळीच मुलीला सावरलं नसतं तर तिचा गंभीर अपघात झाला असता. मात्र, वडिलांच्या सतर्कतेतून मुलगी बचावते, पण कदाचित वडिलांना थोडी दुखापत झाली असावी असं दिसतंय. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरलहॉग नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला इतकी पसंती दिली जात आहे की आतापर्यंत तो लाखो वेळा पाहिला गेला आहे.

नेमकं व्हायरल व्हिडिओ काय :

 

View this post on Instagram

 

A post shared by ViralHog (@viralhog)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Man Quickly Prevents a Girl From Hitting A Pole viral video on social media check details 30 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x