27 June 2022 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दर महिन्याला गुंतवा 1302 रुपये | मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख | योजनेबद्दल जाणून घ्या Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या
x

अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस

मुंबई : आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे की,’अफजल खान उंदीर यांची गळाभेट उद्या होणार तर!’ असं म्हणत या राजकीय भेटीची खिल्ली उडविली आहे. परंतु या ट्विट वरून वाद सुद्धा उद्भवू शकतो.

भाजप आणि शिवसेनेत जरी एकत्र सत्तेत असले तरी त्यांच्यातील वैर हे सर्वश्रुत आहे. एकूणच भाजप आणि शिवसेनेचा कारभार म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच काहीस सुरु आहे. शिवसेनेने आगामी निवडणूक जरी स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला असेल तरी त्यांनी चंद्राबाबूंच्या टीडीपी पक्षा प्रमाणे एनडीए’मधून बाहेर पडण्याची पडण्याची हिम्मत दाखविली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना भाजपसोबत जाणार नाही हे खात्रीने कोणीच सांगू शकणार नाहीत, कारण ते आजही एनडीएचा घटक पक्ष आहेत आणि केंद्रात व राज्यात मंत्रिपदावर सुद्धा आहेत.

नक्की काय ट्विट केलं आहे काँग्रेसने,

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x