24 September 2020 10:52 PM
अँप डाउनलोड

विराट कोहली व अजिंक्य रहाणेची संयमी खेळी, भारत सुस्थितीत

पर्थ : भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, ऑस्ट्रेलियन टीमचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय टीमच्या दोन्ही सलामीवीरांनी निराशा केली आणि ते केवळ ८ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर, कप्तान कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि त्यानंतर मैदानात उतरलेल्या रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा अशा सुस्थितीत ठेवले आहे. सध्या विराट कोहली ८२ धावांवर, तर रहाणे ५१ धावांवर खेळत असून भारत अद्याप १५४ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे उद्या भारतीय फलंदाज पुन्हा काय खेळतात ते पाहावं लागणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x