लोकसभा आढावा: कल्याणमध्ये सेनेच्या शिंदे'शाहीला मनसेच्या पाटील'शाहीकडून सुरुंग लागू शकतो?

कल्याण : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवल्याने मोदी लाटेचा थेट फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला होता. त्यावेळी प्रचारात एकनाथ शिंदे यांनी मोदी लाट असल्याने मोदींच्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे हट्ट लावून धरला होता आणि प्रचाराच्या शेवटच्या क्षणी नरेंद्र मोदी यांना कल्याणमध्ये प्रचारासाठी आणून त्यांच्यानावाने मतांचा जोगवा मागितला गेला. परिणामी शिवसेना आणि भाजपची एकत्रित मतं श्रीकांत शिंदे यांच्या खात्यात पडली होती.
परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी आणि मोदींची शिवसेनेसोबत एकत्रित सभा होण्यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात चर्चा होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमोद पाटील या उमेदवाराची. विशेष म्हणजे रोजच्या प्रचारादरम्यान शिवसैनिक सुद्धा प्रमोद पाटील यांची जोरदार हवा असल्याचं छुप्या रीतीने मान्य करत होते. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेसोबतच्या ज्या मोजक्या सभा नरेंद्र मोदी एकत्रित घेणार होते, त्यात एकनाथ शिंदे यांनी कल्याण मतदार संघासाठी आणि मुलाच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंकडे मोदींच्या सभेसाठी शेवटच्या क्षणी हट्ट केला होता आणि तो फलदायी ठरला होता.
त्यानंतर मोदी लाटेत झालेल्या मतदानात सुद्धा मनसेच्या प्रमोद पाटील यांना तब्बल १,२२,३४९ मतं पडली होती. दरम्यान, याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे हे पक्षाच्या ताकदीवर १,९०,१४३ मतं घेऊन गेले होते आणि राष्ट्रवादीत येण्यापूर्वी ते याच मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असल्याने त्यांचे चांगले नेटवर्क या मतदारसंघात होते. त्याचा फायदा त्यांना २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत झाला होता. परंतु, मागील साडेचार वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. तर २०१४ च्या तुलनेत मनसेने या मतदारसंघात जोरदार पक्ष बांधणी केली असून स्वतः राज ठाकरे, नेते प्रमोद पाटील आणि अभिजित पानसे तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव लक्ष घालत आहेत.
दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील भोंगळ कारभार आणि भाजप-शिवसेना सरकारमधील कुरघोड्यांमुळे या मतदारसंघात भाजप-शिवसेनेबद्दल रोष पाहायला मिळत आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली पोकळ पॅकेजची आश्वासनं गमतीचा विषय बनले आहेत. तसेच निवडणुकीच्या वेळी भर सभेत शिवसेनेच्या राजीनामा-नाट्याचा पहिला प्रयोग करणारे एकनाथ शिंदे सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व बाबींचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच जाणवणार आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या २-३ दिवस आधी एखादं राजकीय नाट्य घडवून आणणारे एकनाथ शिंदे यंदा मतदाराच्या पचनी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे २०१४ मधील निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवणारे भाजप-शिवसेनेचे नेते याच शहराला भारतातील सर्वात घाणेरडं शहर संबोधू लागले.
दरम्यान, आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजप वेगळे लढविल्यास शिवसेना आणि भाजपच्या मतांमध्ये मोठी फूट पडणार हे निश्चित. परंतु, तरी ऐन वेळी लोकसभेसाठी युती केल्यास मतदार अजूनच रोष व्यक्त करेल अशी शक्यता सध्या या मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर दिसत आहे. या मतदारसंघात प्रमोद पाटील हेच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील यात वाद नाही, परंतु त्यांनी ज्याप्रकारे आणि शांतपणे या मतदारसंघात पक्षबांधणी सुरु केली आहे, त्यावरून ते आयत्यावेळी विरोधकांचा घाम काढतील. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांची या मतदारसंघावरील पकड सुटली असून, त्यांचा मार्ग खडतर आहे. यासर्व बाबी मनसेच्या पथ्यावर पडणार असून भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळाला विटलेला मतदार मनसेकडे आकर्षित होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमोद पाटील यांचा दिल्लीचा मार्ग सुकर होऊन शिंदेशाही संपुष्टात आल्यास नवल वाटायला नको.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?