धक्कादायक! पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू
हडपसर, २९ मे : पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच दरम्यान हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह ११ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, हडपसर भागातील एका डेअरीच्या मालकाला कोरोनाची करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे यानंतर संबधित व्यक्तीच्या दुकानातील इतर कर्मचार्यांचीही कोरोना तपासणी केली गेली, तर यामध्ये ते देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत, सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता त्यांच्या डेअरीमधून ज्यांनी वस्तूचे खरेदी केली आहे. त्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत असून त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला असून राज्यात काल दिवभरात २ हजार ५९८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८५ कोरोना रुग्णांनी जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या १ हजार ९८२ वर पोहोचली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल एका दिवसात १४६७ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार ४८५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११३५ वर पोहोचली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. काल दिवसभरात ३६९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ७ हजार ०१२ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात १० जणांनी जीव गमावल्याने कोरोनाबळींची संख्या ३१० वर गेली आहे.
News English Summary: The number of coronary artery disease patients in Pune has been increasing in the last few days. Meanwhile, shocking information has come to light that 11 employees, including a well-known dairy owner from Hadapsar area, have contracted corona. This has created a stir in the area.
News English Title: Pune Hadapsar Dairy Owner Including 11 Employees Are Corona Positive News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News