28 September 2022 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा Property Buying | घरांच्या किंमती लवकरच वाढणार, प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ, ही आकडेवारी जाणून घ्या Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन CIVI 2 लाँच केला, तगडे फिचर्स आणि बरंच काही मिळणार
x

कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी

Covid19, Corona Crisis, Kalyan Dombivli, MLA Raju Patil

कल्याण-डोंबिवली, १२ एप्रिल: महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीही याला अपवाद नाही. कल्याण डोंबिवलीत आजची रुग्णसंख्या ४९ वर पोहचली आहे. ६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने ही संख्या वाढली आहे. कल्याण डोंबिवली महापलिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यात कल्याण-डोंबिवलीत सरकारी पातळीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक गरजा देखील उपलब्ध होतं नसल्याने शहरात भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.

कल्याण डोंबिवलीतील इतर आमदार-खासदार सुस्त असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र शहरातील नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जपल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील इतर पक्षाचे राजकिय नेते केवळ अंतर्गत राजकारणापायी खोडा घालण्यासच तत्पर असल्याचं ध्यानात आल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतःच्या कौटुंबिक मालकीचे खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पालिकेला दिले आहे.

आर आर हाॅस्पिटलमध्ये १५ ते २० व्हेटंटीलेटर आणि १०० बेडची सुविधा तसेच इतर सुविधा देखील उपयुक्त असल्याने राजू पाटील यांनी मोठेपणा दाखवत ते स्वतःच महापालिकेच्या सेवेत दिले आहे. आर.आर.हाॅस्पीटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती, ती आता पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर उपचार हॉस्पिटल मधील आणि आयएमएचे डॉक्टर करतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

News English Summary: In Maharashtra, 221 new coronary-positives were detected during the day. Therefore, the number of coroners in Maharashtra has reached 1982. This information is provided by the Health Department of the Government of Maharashtra. Today, 3 patients died in Maharashtra due to corona. Of the 22 dead, 16 died in Mumbai, 3 in Pune and 2 in Navi Mumbai. One death has been reported in Solapur. This has become news which has added to the concerns of Maharashtra.

News English Title: Story MNS MLA Raju Patil handover R R Hospital for Kalyan Dombivli Covid19 New Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x