3 May 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा? IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार?
x

शिवतीर्थावर ऐतिहासिक जनसागर लोटला आणि शिंदे-भाजपचा तोरा उतरला, शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सिद्ध झालं

Shivsena

Uddhav Thackeray | दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. “ज्यावेळेला शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला. विशेष म्हणजे या मेळाव्याला शिवतीर्थावर ऐतिहासिक जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं.

“आज जे तुम्ही केलंत, हेच तर मी तुम्हाला सांगत होतो. अडीच वर्ष तुमची अडीच वर्ष शिवसेनेची. तेव्हा तुम्ही म्हणालात शक्य नाही. आता जे केलं तेव्हा का नाही केलं. पण शिवसेना संपवायचीये. इतक्यावरच नाहीये. हाव किती. इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झालात. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेनाप्रमुख व्हायचं. शिवसेनाप्रमुख म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारणार का? आहे लायकी?”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधत तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे. अमित शाहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं. भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं.

उद्धव ठाकरे म्हणाले, आनंद दिघे एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांना जाऊन 20 वर्षे झालीत. आज त्यांची आठवण आली. ते एकनिष्ठ होते. जाताना ते भगव्यातून गेली. ही सर्व माणसं बघितल्यावर बोलण्याची पंचाईत होते. देवेंद्र फडणवीस यांना कायदा चांगला कळतो. हा काही टोमणा मारला नाही. सभ्यगृहस्थ आहेत. हा टोमणा नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना म्हणाले होते, पुन्हा येईन पुन्हा येईन. दीड दिवसासाठी आले. दीड दिवसात विसर्जन झाले.

ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला. डोक्यांचा नाही खोक्यांचा. पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Mumbai Dasara Shivajipark Rally Uddhav Thackeray attacked on Shinde camp check details 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Chief Uddhav Thackeray(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x