14 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मोदी है तो मुमकिन है | पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल | सलग ३ दिवस दरवाढ

petrol diesel price

मुंबई, २७ सप्टेंबर | आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे (Petrol Diesel Price Hike) दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.

Petrol Diesel price hike will affect on inflation which will impact common man in India :

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये आज सोमवारी सलग २२ व्या दिवशी पेट्रोलचे दर १०१.१९ रुपये प्रती लिटरवर स्थीर आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये २५ पैशांची वाढ झाल्याने ते ८९.३२ रुपये प्रती लिटरवर पोहचले आहेत. मुंबईमध्येही प्रति लिटर पेट्रोलसाठी १०७.२६ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर मात्र शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

देशभरात मागील ४ दिवसांमध्ये डिझेलचा भाव तिनदा वाढलाय. तीन दिवसांमध्ये डिझेल लिटरमागे ७० पैशांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी तर २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचा प्रति लिटर दर वाढवला होता. आज सलग तिसऱ्या दिवशी २५ पैशांनी डिझेलचा दर वाढवण्यात आलाय. डिझेल सप्टेंबर महिन्यामध्ये ७० पैशांनी महागलं आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: After petrol diesel price may reached on highest level as per new rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x