20 August 2022 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

Bharat Bandh | हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये भारत बंदचा मोठा परिणाम

Bharat Bandh

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहील असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान, संपूर्ण देशात शेतकरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन आणि रेल्वे रुळावरही आंदोलन करत आहे. या भारत बंदचा (Bharat Bandh of farmers) सर्वात जास्त परिणाम हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसत आहे.

Bharat Bandh all over India farmers protest AAP congress supports farmers now traffic impact in Delhi :

सर्वच विरोधी पक्षांचा जाहीर पाठिंबा:
शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेस, आरजेडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स संघ (AIBOC) नेही भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार करण्यास तयार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात यूपी, हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी मागील 10 महिन्यांपासून धरणे आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग, वकील आणि विद्यार्थीही पाठिंबा देत आहेत. पश्चिम यूपीच्या 27 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जर तुम्ही आज महामार्गावर बाहेर जाण्याची तयारी करत असाल तर सावधगिरीने बाहेर जा. सर्व मुख्य रस्ते आणि महामार्गांवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bharat Bandh all over India farmers protest AAP congress supports farmers now traffic impact in Delhi.

हॅशटॅग्स

#Bharat Bandh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x