13 December 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Bharat Bandh | शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद | देशभर जोरदार निर्दर्शने

Bharat Bandh farmers

मुंबई, २७ सप्टेंबर | केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाचे वतीने (Bharat Bandh) आंदोलन सुरू आहे. हे आदोलन आथा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. आज (सोमवारी) सकाळी 6 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस आणि आपने पाठिंबा जाहीर केला आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कायदे संसदेत मंजूर झाले. हे तेच कायदे आहेत, ज्यांच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे. ते तीन कायदे काय आहेत ज्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यात एक प्रकारचा संघर्ष उभा राहिला आहे, ते जाणून घेऊया.

Bharat bandh live updates Delhi UP traffic hit farmers block highways in Punjab and Haryana :

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक 2020:
यानुसार शेतकरी आपली पिके हव्या त्या ठिकाणी विकू शकतात. आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय इतर राज्यामध्ये पिकांचे घेतलेले उत्पादन विकू आणि खरेदी करू शकतो. याचा अर्थ एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) च्या कार्यक्षेत्राबाहेर पिके खरेदी आणि विक्री करता येतात. तसेच, पिकाच्या विक्रीवर कोणताही कर लागणार नाही. ऑनलाईन विक्रीलाही परवानगी असेल. यामुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळेल.

शेतकऱ्यांचा आक्षेप:
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ते त्यांच्या इच्छेनुसार उत्पादन विकण्यास त्यांना मुभा नाही. तसेच बाजार समितीनुसार अन्य ठिकाणी माल साठवणुकीच्या सुविधा नाहीत. त्यामुळे ते चांगला भाव मिळे पर्यंत शेतमाल घेऊन वाट पाहू शकत नाहीत. खरेदीला लागणारा वेळ पाहता शेवटी शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीने मालाची विक्री करण्याचा पर्याय निवडावा लागतो. तसेच बाजारातील कमिशन एजंट हे शेतकऱ्यांना शेती आणि वैयक्तिक गरजांसाठी उसणे पैसे देतात. प्रत्येक एजंटशी सरासरी 50-100 शेतकरी जोडलेले असतातच. मात्र बऱ्याचदा हे एजंट अत्यंत कमी किमतीत पीक खरेदी करतात आणि त्याची साठवणूक करतात व पुढील हंगामात एमएसपीवर त्याची विक्री करून जास्त नफा कमवतात असे आंदोलक शेतकऱ्यांचे मत आहे.

किंमत हमी आणि कृषी सेवा कायदा 2020:
देशभरात कंत्राटी शेतीची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. पीक अयशस्वी झाल्यास, त्याचे नुकसान शेतकऱ्यांनी नव्हे तर कंत्राटी पक्षांनी किंवा कंपन्यांनी भरून द्यावे लागेल. शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) हा कायदा शेती करारावर राष्ट्रीय आराखडा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करेल, जे शेतकर्‍यांना कृषी-व्यवसाय कंपन्या, प्रक्रिया उद्योग, घाऊक विक्रेते, निर्यातदार किंवा मोठ्या विक्रेत्यांसह शेती सेवा आणि भावी शेतीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी परस्पर मान्य केलेल्या मोबदल्याच्या किंमतीत योग्य आणि पारदर्शक पद्धतीने आणि त्यायोगे संबंधित किंवा संबंधित गोष्टींसाठी गुंतवणूकीस सामर्थ्य प्रदान करेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि मध्यस्थ राजवट संपेल.

शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत -शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मोठ्या कंपन्या वादग्रस्त परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील आणि पिकाची किंमत ठरवतील. मोठ्या कंपन्या छोट्या शेतकऱ्यांशी तडजोड करणार नाहीत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bharat Bandh farmers are protesting all over India against Farm Laws of Modi government.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x