17 November 2019 9:45 PM
अँप डाउनलोड

प्रभू रामचंद्र हे हिंदूंचेच नाही, मुस्लिमांचेही वंशज: रामदेवबाबा

नवी दिल्ली : प्रभू रामचंद्र हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा पूर्वज आहेत, त्यामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर काही करून होणारच. अयोध्येत राम मंदिर होणार नाहीतर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा प्रति प्रश्न सुद्धा योगगुरू रामदेवबाबा यांनी उपस्थित केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राम मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी उचलून धरण्यात येत आहे. शिवसेनेने सुद्धा हा कळीचा मुद्दा करत भाजपाला अडचणीत आणलं आहे. तर देशभरातल्या साधू संतांची तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांची तीच मुख्य मागणीआहे. परंतु, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अध्यादेश काढण्याचा प्रश्नच नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे. तरी सुद्धा या ना त्या कारणाने राम मंदिराचा प्रश्न पुन्हा चर्चिला आणला जातो आहे. दरम्यान, काही दिवसांपासून राम मंदिर नाही तर मत सुद्धा नाही, असेही फलक झळकू लागले होते

नेमकं काय म्हटले योगगुरु रामदेवबाबा?

प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येतच होणार. अयोध्येत नाही तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का मदिनाला होणार का? अयोध्या ही केवळ रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद सत्य आहे. तसेच प्रभू राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा वंशज आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या