26 April 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

२०२४ मध्ये दोन कोटी मतांचं लक्ष्य | आता भाजप स्वबळावरच लढणार - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil, media, BJP

पुणे, ६ एप्रिल: आज भाजपाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत.

यावेळी माध्यमांना माहिती देताना ते म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वाय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपचा आज वर्धापन दिन होता. त्यामुळे आम्ही सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही 2024मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत. अर्थातच आमचे सहयोगी पक्ष आमच्यासोबत असतीलच, असंही ते म्हणाले. स्वबळावर लढून राज्यात सरकार आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: Today is the 41st anniversary of the BJP. On this occasion, Maharashtra State President Chandrakant Patil saluted the flag at the Bharatiya Janata Party office in Pune. After that, Chandrakant Patil, while interacting with the media, has given big hints about the future course of the BJP.

News English Title: Chandrakant Patil interacting with the media on 41st anniversary of the BJP news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x