28 May 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कर्नाटक निवडणूक, भाजप 'IT सेल' ने आधीच तारीख फोडली

नवी दिल्ली : कर्नाटक विधासभेच्या निवडणुकांची तारीख खुद्द निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधी ती भाजपच्या ‘IT सेल’ ने घोषित केल्याने भाजप संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. परंतु काही पत्रकारांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदे दरम्यान आयोगाने तारीख घोषित करण्याआधी भाजपच्या ‘IT सेल’ ने कशी काय तारीख घोषित केली असा प्रशा उपस्थित केल्यावर, त्यांनी हे खूपच गंभीर असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. निवडणूक अयोग या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करेल असा थेट इशाराच निवडणूक आयोगाने दिला आहे.

नरेंद्र मोदी आणि कॉग्रेस या दोघांसाठी कर्नाटक विधानसभा ही खूप महत्वाची असून, त्यातूनच २०१९ मधील कल समजणार आहेत. त्याच कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्यासाठी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परंतु निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असतानाच भाजप ‘IT सेल’ विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच ट्विटरवरून कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख आणि मतमोजणीची तारीख घोषित करून टाकल्याने सर्वच अचंबित झाले आहेत. भाजप ‘IT सेल’ विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी १२ मे रोजी मतदान आणि १८ मे रोजी मतमोजणी होईल असे ट्विट करून घोषित करून टाकले.

पत्रकारांनी लगेचच पत्रकार परिषदेत भाजप ‘IT सेल’ विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या ट्विट बद्दल विचारले असता त्यांनी हे खूपच गंभीर असल्याचे म्हटले. निवडणूक अयोग या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करेल असा थेट इशाराच निवडणूक आयोगाने दिला आहे. दरम्यान भाजप ‘IT सेल’ विभागाचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजप ‘IT सेल’ गोत्यात येईल हे लक्षात येताच त्यांनी ते विवादित ट्विट काही मिनिटांनीच हटवले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतील सर्व घडामोडी भाजप ‘IT सेलला’ आधीच कशा समजतात असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x