11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

BIG BREAKING | आगामी लोकसभा निवडणूक INDIA विरुद्ध NDA अशी होणार, विरोधी महाआघाडीच्या नावाने मोदी-शहांची चिंता अजून वाढणार

BIG BREAKING

INDIA Vs NDA | बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत विरोधी महाआघाडीची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला दुजोरा दिला आहे. या आघाडीचे नवे नाव “इंडिया” म्हणजेच “इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स” असेल.

या नावाने राजद आणि शिवसेनेने ट्विट केले आहे. इतकंच नाही तर टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन यांनीही चक दे इंडिया असं ट्विट केलं आहे. “इंडिया” नावाच्या या आघाडीत तामिळनाडूचा पक्ष द्रमुक, जम्मू-काश्मीरचा नॅशनल कॉन्फरन्स ते पीडीपी यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार २६ पक्षांच्या या गटाला नवे नाव देण्यात आले असून, त्याला बैठकीत सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला असल्याचं वृत्त आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली खान म्हणाले की, राहुल गांधी यांनी बैठकीत हा प्रस्ताव ठेवला. त्यांनी बैठकीला उपस्थित सर्व पक्षांनी स्वागत केले. राजदने या नव्या नावावर भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, भाजपला आता ‘इंडिया’ म्हणण्यासही अडचण येईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नव्या नावाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, आम्ही सर्व जण एकत्र राहू. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही ट्विट करून नव्या नावाची माहिती दिली आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये टीम इंडिया विरुद्ध टीम एनडीए असा सामना होणार आहे. ‘चक दे इंडिया’

News Title : BIG BREAKING Lok Sabha Election 2024 INDIA Vs NDA check details on 18 July 2023.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x