27 July 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Bharat Bandh | जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर | दुकाने बंद करण्याचं आवाहन

Bharat Bandh

जळगाव, २७ सप्टेंबर | केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात (Bharat Bandh of farmers) आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

Famers called Bharat Bandh against New Farm Laws NCP party support famers protest in Jalgaon :

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या बाबीचा निषेध नोंदवण्यासह दिल्लीतील आंदोलनाला पाठबळ म्हणून आज काँग्रेससह देशभरातील समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. याच अनुषंगाने आज जळगावातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांनी भारत बंद पाळला जात आहे.

बाजारपेठ सुरू, नेते उतरले रस्त्यावर:
आज देशव्यापी भारत बंद आंदोलन असताना जळगावात मात्र सकाळपासूनच बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठेचा मुख्य भाग असलेल्या महात्मा फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ भागात फिरून दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही व्यापारी दुकाने बंद करत नसल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भारत बंद आंदोलनाची भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणारे आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र सरकारला त्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे, याच अनुषंगाने आज भारत बंद पाळला जात आहे. हा बंद सर्वांनी यशस्वी करून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील यावेळी मत मांडले. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी रस्त्यावर येईल. व्यापारी आणि भांडवलदारांची मर्जी चालेल. केंद्राने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCP Congress party join the protest to support farmers Bharat Bandh in Jalgaon.

हॅशटॅग्स

#Bharat Bandh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x