26 April 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

ट्विटरवर #RejectFadnavisForCM हॅशटॅग ट्रेण्डमध्ये

CM Devendra Fadnavis, BJP Maharashtra, Twitter Trending, RejectFadnavisForCM

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असतानाही सत्ता स्थानपनेची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने आता भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. तर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपापली मतं व्यक्त करत आहेत.

ट्विटरवर सध्या #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. हा हॅशटॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत. तर अनेकजण असं सुचवत आहेत की शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला हवं. जेणेकरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून आणि भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर राहील.

विधानमंडळाच्या शेवटच्या भाषणात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र शिसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत ५०-५०चा आग्रह धरत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी करत असल्याने भारतीय जनता पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत वारंवार शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार असून त्याचा शिवतिर्थावर शपथविधी संपन्न होईल असा दावा करत आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे असं शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे त्यामुळे ते विरोधात बसणार हे उघड आहे. राष्ट्रवादीने तर विधीमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवडही केली आहे. असं असलं तरीही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं काही ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु आहे असंच राजकीय वर्तुळातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष चर्चेसाठी तयार आहे मात्र शिवसेना नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी दावा करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x