14 November 2019 12:07 AM
अँप डाउनलोड

'एक देश एक भाषा' धोरणावरून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया देखील 'तमिळ भाषेत'

One Nation One language, Tamil language, Gujarati Language, Marathi Language, Raj Thackeray, M K Stalin

नवी दिल्ली: हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा झाली पाहिजे या आग्रह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी धरला होता. याचं कारण हेच होतं की परकिय भाषाचं आक्रमण आपल्या भाषांवर होऊ नये.” असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक देश एक भाषेचा नारा दिला आहे. हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वाधिक जास्त बोलली जाणारी हिंदी भाषा आज देशाला एकसंध बांधण्याचे काम करत आहे. संपूर्ण देशात एक भाषा होणे अत्यंत गरजेचे आहे. जी जगात भारताची ओळख बनेल, असे अमित शाह यांनी सांगितले. मात्र, ‘एक देश एक भाषा’ या धोरणाला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.

अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Amit Shah(174)#Tamil Nadu(5)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या