27 July 2021 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ अचानक बेपत्ता

CCD, Cafe Coffee Day, vg siddhartha, karnataka former cm SM krishna, Income tax raid on vg siddhartha

बंगळुरू : देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीएस शंकर हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा फोनही स्विच ऑफ असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास ६ वाजण्याच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असं सांगितलं. ड्रायव्हरने ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली.

सिद्धार्थ सोमवारी बेंगळुरुला येत होते, त्याच दरम्यान संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ते कारमधून उतरले आणि फिरू लागले. मात्र फिरता फिरताच ते बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी काहीही संपर्कही होऊ शकलेला नाही. जावई बेपत्ता झाल्याने एस. एम. कृष्णा चिंतेत आहेत. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. चार दशकांहून अधिक काळ ते काँग्रेसमध्ये होते. तसेच ते महाराष्ट्राचे राज्यपालही होते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने २०१७ मध्ये छापे घातले होते. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे (सीसीडी) ग्रुपचे संस्थापक, मालक व अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ १७ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीचे अध्यक्ष झाले. या धाडीनंतर शेअर बाजारात कॉफी डे इंटरप्राइजेसचे शेअर भाव कोसळले होते.

हॅशटॅग्स

#india(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x