2 May 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे वृत्त; राजकीय गोंधळ कायम

BJP Maharashtra, Shivsena

मुंबई: शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.

दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरू आहे. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निवांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असं कळतं. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निश्चिंत असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्ष अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही असंही समजतं.

मात्र, महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा, हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. मराठी जनतेला कमी लेखू नका, असा इशाराही शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर भाजपसोबत इतर पक्षांवरही टीका होईल. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने हे त्रांगडं निर्माण झालं, अशी रणनीती भाजपकडून आखली जाऊ शकते. तर दुसरीकडे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण येत्या काही दिवसात राम मंदिराचा निकाल लागणार आहे. त्यावेळी कोणता पक्ष काय भूमिका घेतो, हे ठरणार आहे. तसंच झारखंड निवडणूकही प्रमुख मुद्दा आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली तर कुठल्या तोंडाने निवडणुकीला सामोरं जायचं, असा प्रश्न पक्षासमोर आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x