14 July 2020 6:09 PM
अँप डाउनलोड

पीडीपी'च्या सर्व निर्णयात भाजप सुद्धा सोबत होता: मेहबुबा मुफ्ती

जम्मू आणि काश्मीर : भाजपने जम्मू आणि लडाख संदर्भातील केलेले आरोप खोटे असून, जम्मू आणि काश्मीरमधील सरकारच्या सर्व निर्णयात भारतीय जनता पक्ष सुद्धा पीडीपी सोबत होता अशी रोखठोक प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना केलेले सर्व आरोप खोडून काढत त्यांनी भाजपला अडचणीत आणले आहे अशी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पत्रकार परिषद आयोजित करून जम्मू व लडाखमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप पीडीपी वर केला होता. तसेच स्थानिक काश्मीरी नागरिकांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

ट्विटर द्वारे मेहबुबा मुफ्ती यांनी अमित शहा यांना उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सत्तेतील आमच्या माजी सहकारी पक्षाने पीडीपी’वर केलेले आरोप चुकीचे असून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या ‘अजेंडा ऑफ अलायंस’ प्रती आपली प्रतिबद्धता कधीही तुटू दिली नाही. तरी सुद्धा भाजप स्वतःची जवाबदारी झटकून पीडीपी’वर उलट आरोप करत आहे, असं म्हटलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x