26 April 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

FinCEN Files | भारतासह जगभरात राजकीय भूकंप होणार | १९९९ ते २०१७ मधील घोटाळे-अफरातफर

Fincen files, corruption, scams, tax evasion, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर : घोटाळे, अफरातफर आणि करचोरीच्या माध्यमातून देशात झालेल्या तब्बल दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, २जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरणासह करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) यांच्या मदतीने या नावांचा उलगडासुद्धा होऊ लागला आहे. फिनसेन फाइल्सने ज्या नावांची यादी तयार केली आहे, त्याची माहिती आता ८८ देशांमधील १०९ हून अधिक वृत्तसंस्थांना झाली आहे. त्यामुळे ही नावे जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार फिनसेनकडून मिळालेल्या दोन हजार गोपनीय कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पैशांची मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या देवाणघेवाण करणाऱ्या अनेक भारतीयांच्या नावांचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या अफरातफरीमध्ये ज्यांच्या मदतीने हे घोटाळे झाले, त्या बँकांच्या नावांचाही समावेश आहे.

फिनसेन फाइल्सच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये १९९९ ते २०१७ या काळात भारतात घडलेल्या घटनांचा समावेश आहे.वृत्तात म्हटल्याप्रमाणे भारतातील बँकांच्या ३ हजार २०१ खात्यांमधून १.५३ अब्ज डॉलर सुमारे ११२ कोटी रुपयांची देवाणघेणाव झाली. यापैकी अनेकांचे पत्ते भारतातील आहेत. तर काही परदेशी पत्त्यांचाही उल्लेख आहे. भारतातील ४४ बँकांचा वापर अवैधरीत्या देवाणघेवाण करण्यासाठी झाला आहे. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे.

 

News English Summary: Leaked documents involving about $2tn of transactions have revealed how some of the world’s biggest banks have allowed criminals to move dirty money around the world. They also show how Russian oligarchs have used banks to avoid sanctions that were supposed to stop them getting their money into the West. It’s the latest in a string of leaks over the past five years that have exposed secret deals, money laundering and financial crime. The FinCEN files are more than 2,500 documents, most of which were files that banks sent to the US authorities between 2000 and 2017. They raise concerns about what their clients might be doing.

News English Title: Fincen files corruption 2 lakhs crores scams tax evasion if names are announced Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#FincenFiles(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x